दापोली तालुक्यातील वाकवली येथे दुचाकीचा अपघात, एकाचा मृत्यू

*दापोली-खेड रस्त्यावरील उन्हवरे फाट्याजवळ आज पहाटेच्या सुमारास एका दुचाकीचा भीषण अपघात झाला. या अपघातात एका ३४ वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला असून त्याचा मित्र गंभीर जखमी झाला आहे
नरेश चंद्रकांत रुके (वय ३४, रा. जालगाव) व अमित अरुण माने (वय ३५, रा. काळकाई कोंड) हे ३१ मार्च २०२६, पहाटे ३:०० च्या सुमारास हे दोघे अ‍ॅक्टिव्हा गाडीने जात असताना चालकाचा ताबा सुटल्याने गाडी रस्त्याच्या कडेला उलटली. पहाटे ५:०० च्या सुमारास पोलिसांना अपघाताची माहिती दिली.दोघांनाही तातडीने उपजिल्हा रुग्णालय, दापोली येथे नेण्यात आले, मात्र उपचारापूर्वीच नरेश रुके यांचा मृत्यू झाला होता. जखमी अमित माने यांना पुढील उपचारासाठी डेरवण येथे हलवण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button