
किल्ला, रत्नागिरी येथे श्री हनुमान जन्मोत्सवानिमित्त विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन
रत्नागिरी–
श्री हनुमान सेवा मंडळ, किल्ला, रत्नागिरी यांच्या वतीने गुरुवार दिनांक ०२ एप्रिल २०२६ रोजी श्री हनुमान जन्मोत्सवानिमित्त विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
या निमित्ताने श्री ॥सत्यनारायण॥ महापूजेचे आयोजन करण्यात आले असून तिर्थप्रसादाची वेळ सायंकाळी ०४ ते रात्री ११.०० वाजेपर्यंत राहणार आहे.
कार्यक्रमाची सुरुवात बुधवार दिनांक ०१ एप्रिल २०२६ रोजी सायंकाळी ०५ ते ०८ वाजेपर्यंत महिला व लहान मुलांसाठी फनी गेम्सने होणार आहे. त्यानंतर रात्री ०९ ते ११ वाजेपर्यंत स्थानिक कलाकारांचा रेकॉर्ड डान्स सादर केला जाणार आहे. मध्यरात्री १२ वाजता महापुरुष, राखणदार व देवी-देवतांचे मानाचे श्रीफळ अर्पण करण्यात येणार आहे.
गुरुवार दिनांक ०२ एप्रिल २०२६ रोजी सकाळी ६ वाजून ३९ मिनिटांनी श्रींचा जन्मकाळ साजरा करण्यात येणार असून सकाळी ११ वाजता श्री सत्यनारायण पूजा पार पडणार आहे. तसेच दुपारी ०१ ते ०३ वाजेपर्यंत महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.
सायंकाळी ०६ ते ०८ वाजेपर्यंत सुश्राव्य भजनाचा कार्यक्रम होणार आहे. यानंतर रात्री ठिक १०.०० वाजता श्री जुगाई देवी नमन मंडळ, नरबे (घाणेकरवाडी) यांच्यातर्फे बहुरंगी नमन सादर करण्यात येणार आहे. या नमनामध्ये ‘कामासुराचा वध’ हा गण, ‘साजशृंगाराने सजलेली नटखट गौळण’ तसेच खास आकर्षण म्हणून राम-रावण नृत्य व युद्ध सादर केले जाणार आहे.
हा सर्व कार्यक्रम श्री हनुमान मंदिर, किल्ला, रत्नागिरी येथे पार पडणार असून भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.




