
कोकण रेल्वे मार्गावर वंदे भारत एक्स्प्रेसच्या धडकेत वृद्धाचा मृत्यू
मुंबई-गोवा कोकण रेल्वे मार्गावर धावणार्या वंदे भारत एक्स्प्रेसच्या धडकेत आंबेड खुर्द येथील शांताराम तानु येल्ये (६२, आंबेड खुर्द) यांचा मृत्यू झाला.
मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी सकाळी सुमारे १० वाजण्याच्या सुमारास आंबेड-भंडारवाडी येथील सुरंग बोगद्याजवळ ही घटना घडली. शांताराम येल्ये हे रेल्वे रुळ ओलांडत असताना किंवा रुळाच्या कडेला चालत असताना भरधाव वेगाने येणार्या वंदे भारत एक्स्प्रेसची त्यांना जोरदार धडक बसल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
घटनेची माहिती मिळताच आंबेड खुर्दचे पोलीस पाटील सुरेश राहटे यांनी तात्काळ संगमेश्वर पोलीस ठाण्यात खबर दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा करून मृतदेह पुढील कार्यवाहीसाठी हलविण्यात आला. अधिक तपास संगमेश्वर पोलीस ठाण्याचे अधिकारी आर. एस. गावीत करत आहेत.www.konkantoday.com




