
पोस्ट विभागाचे 1 व 2 एप्रिल रोजी व्यवहार बंद
रत्नागिरी, दि. 27 ) :- आर्थिक वर्ष 2025-26 हे 31 मार्च रोजी संपत आहे. सरत्या आर्थिक वर्षाच्या दृष्टीने काही कामकाज वर्ष अखेर करणे आवश्यक असल्याने 1 एप्रिल व 2 एप्रिल 2026 हे दोन दिवस व्यवहार बंद दिवस म्हणून पोस्ट विभागाने घोषित केले आहेत.
या दोन दिवशी सर्व सीबीएस पोस्ट ऑफिसमध्ये काउंटर वर कोणतेही पीओएसबी चे व्यवहार केले जाणार नाहीत. तसेच डीओपी ई बँकिंग/एम बँकिंग, आयपीपीबी-पीओएसबी स्वाईप इन व स्वाईप आऊट या सर्व सुविधा 1 व 2 एप्रिल 2026 दोन दिवशी उपलब्ध असणार नाहीत पोस्ट ऑफिसच्या सर्व ग्राहकांनी याची नोंद घ्यावी, असे आवाहन अधीक्षक डाकघर रत्नागिरी यांनी केले आहे.



