
रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या विषय समित्यांची सभापती निवड
रत्नागिरी : जिल्हा परिषदेच्या विषय समित्यांच्या सभापती पदांची निवड आज (२५ मार्च) बिनविराेध झाली आहे. मंगळवारी उशिरा पालकमंत्री उदय सामंत यांनी ही नावे जाहीर केली होती. यामध्ये समाजकल्याण समिती सभापतीपदी ॲड. सुयोग कांबळे यांची, कृषी व पशुसंवर्धन समिती सभापतीपदी महेश नाटेकर, शिक्षण व अर्थ सभापतीपदी नंदकुमार मुरकर,नंतर महिला व बालकल्याण समिती सभापतीपदी मयुरी शिर्के यांच्या नावांचा समावेश होता.
सर्व नूतन सभापती त्यांच्या दालनात विराजमान होत असताना माजी आमदार संजय कदम, माजी आमदार सदानंद चव्हाण, अध्यक्षा अस्मिता केंद्रे, उपाध्यक्ष विलास चाळके, माजी अध्यक्ष राजेंद्र महाडिक, जिल्हाप्रमुख राहुल पंडित, महेश म्हाप, माजी उपाध्यक्ष संतोष थेराडे, अण्णा कदम, नेताजी पाटील, सभापती प्रणव पोळेकर, संजय साळवी व अन्य पदाधिकारी उपस्थित होते.
दरम्यान, या निवडणुकीचे निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून रत्नागिरीचे प्रांताधिकारी जीवन देसाई यांनी काम पाहिले. या वेळी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे आणि उपमुख्यकार्यकारी अधिकारी विजयसिंह जाधव हे उपस्थित होते.
सभापतीपदाच्या निवडीनंतर शिंदेसेनेच्या पदाधिकारी, कार्यकार्त्यांनी फटाके वाजवून जल्लोष केला.




