
लक्ष्मी ऑरगॅनिकच्या सांडपाण्याच्या अहवालाच्या संदर्भात आंदोलकांचे लक्ष लागले..
खेड तालुक्यातील लोटे औद्योगिक वसाहतीतील ’लक्ष्मी ऑरगॅनिक’ केमिकल लिमिटेड कंपनीतून नेल्या जाणार्या सांडपाण्याला विरोध झाला आहे. या पाण्यात पिफासचा अंश असल्याचा आरोप आंदोलनकर्ते व ग्रामस्थांमधून होत आहे. त्यामुळे ताब्यात घेतलेल्या पाण्याच्या नमुन्यांचा प्रदूषण नियंत्रण मंडळ काय अहवाल देते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तर या मंडळावर विश्वास नसल्याने पाण्याचे नमुने बेंगलोर व इटलीला पाठवले जाणार असल्याची माहिती आंदोलक असलेल्या उदय घाग यांनी दिली आहे.
या कंपनीत मानवी व निसर्गाला हानिकारक असलेल्या पिफासचे उत्पादन घेतले जात असल्याचा आरोप करीत कोकण पर्यावरण सरंक्षण संघर्ष समिती आंदोलन पुकारले आहे. तर दुसरीकडे गेल्या ६५ दिवसांपासून येथे धरणे आंदोलन सुरू असून ६ एप्रिलला लोटे परिसरातील ग्रामस्थ भव्य मोर्चा काढणार आहेत. असे असताना कंपनी आजही आपले काम करीत आहे.
www.konkantoday.com



