स्वामी स्वरूपानंद सेवा मंडळातर्फे२७ पासून अध्यात्मिक कार्यक्रम

रत्नागिरी : स्वामी स्वरूपानंद सेवा मंडळाने (पावस) वरची आळी येथील अध्यात्म मंदिरात प्रवचने, अनुभवकथन आणि कीर्तन अशा तीन अध्यात्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. येत्या २७ ते २९ मार्च दरम्यान सायंकाळी ५.४५ ते ७.३० या वेळेत हे कार्यक्रम होणार आहे.

स्वामी स्वरूपानंद सेवा मंडळ आणि सारस्वत स्नेहवर्धक मंडळाच्या संयुक्त विद्यमाने २७ रोजी अध्यात्म मंदिरात “नर्मदा परिक्रमेचा दिव्य अनुभव” या विषयावर मिलिंद तेंडुलकर यांचे व्याख्यान होणार आहे. त्यांची मुलाखत प्रा. विस्मया कुलकर्णी मुलाखत घेणार आहेत. २८ मार्च रोजी संत दिसती वेगळाले, परी ते स्वरूपी मिळाले या विषयावर अस्मिता अरुण देशपांडे यांचे प्रवचन आयोजित करण्यात आले आहे. २९ मार्च रोजी रत्नागिरी कीर्तनकार मंडळाच्या विद्यमाने एकादशी कीर्तनसेवा उपक्रमांतर्गत हभप मयुरी जोशी यांचे कीर्तन होणार आहे. या तीन दिवसीय कार्यक्रमास रत्नागिरीकरांनी उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button