
लोटेतील ॲक्वा फूड एक्झीम कंपनीतून १० लाखांचे साहित्य चोरीला
खेड : तालुक्यातील लोटे औद्योगिक वसाहतीमधील ॲक्वा फूड एक्झीम कंपनीतून अज्ञात चोरट्याने १० लाखांच्या साहित्याची चोरी करून पोबारा केला. ही घटना २५ फेब्रुवारी दुपारी १ ते १४ मार्च रोजी दुपारी २ या कालावधीत घडली आहे. या चोरीची फिर्याद धीरजलाल मंटूलाल बरूई (वय ४१, सध्या रा. फ्लॅट नं. २०३, दुसरा मजला, ताम्हाणे हर्मनी पाग, ता. चिपळूण, मूळ रा. कोलकता) यांनी खेड पोलीस ठाण्यात दिली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, या कंपनीतून डेन्मार्क देशातून विकत घेतलेले डॅनटेक फ्रिजोंग सिस्टीम, मशिनचे विविध पार्ट तसेच नामढुंग जॉईंट स्टॅक कंपनी या मशिनचे काही पार्ट सोबत दोन व तीन टन कष्टींग वॉशर अशा एकूण १० लाख रुपये किंमतीच्या आठ साहित्यांची चोरी करून अज्ञात चोरट्यांनी पोबारा केला आहे.




