
असुर्डे खापरेवाडीतील ग्रामस्थांचा राष्ट्रवादीत जाहीर प्रवेश
चिपळूण: तालुक्यातील कोकरे जिल्हा परिषद गटातील असुर्डे खापरेवाडी येथील ग्रामस्थांनी आमदार शेखर निकम यांच्या विकासाभिमुख कार्यपद्धतीवर विश्वास ठेवत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये जाहीर प्रवेश केला. या प्रवेशामुळे स्थानिक राजकारणात चांगलीच चर्चा रंगली असून शिवसेना (उबाठा) पक्षाला मोठा धक्का बसल्याचे मानले जात आहे.
या प्रवेश सोहळ्यात सोमा खापरे, काशिनाथ खापरे, संतोष खापरे, अजित खापरे, सुमित खापरे, राजेंद्र खापरे, प्रमोद खापरे, प्राजक्ता खापरे, अंकित खापरे, वंदना खापरे, शशिकांत खापरे, सुगंधा खापरे, योगेश खापरे, आरती खापरे, स्वाती खापरे, आयुष आग्रे, आर्यन खापरे, दिनेश खेराडे, सुजाता खेराडे, नरेंद्र खापरे, मानसी खापरे, राजेश आग्रे, कृष्णा आग्रे, अरुण आग्रे, अर्चना आग्रे, सायली आग्रे, मंगेश खापरे, गणपत खापरे, मिनाक्षी खापरे, अंजली खापरे, मारुती खापरे, प्रणय खापरे, बापूजी खापरे, सुजाता खापरे, महेंद्र खापरे, सुस्मिता खापरे, पांडूरंग खापरे, प्रतिभा खापरे, महेश खापरे, शांताराम शिगवण, विशाल शिगवण, दत्ताराम खापरे, कृष्णा खापरे, सुरज खापरे, सावी खापरे, रेश्मा खापरे, शर्मिला भुवड, धोंडू भुवड, संदेश खापरे, पारस खापरे, गणेश खापरे, सृष्टी खापरे, नारायण खापरे, ओम खापरे, सार्थक खापरे, निखील खापरे, ओम भुवड यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.
यावेळी आमदार शेखर निकम यांनी सर्व नवप्रवेशितांचे संपर्क कार्यालयात मनापासून स्वागत करत त्यांच्याशी सविस्तर संवाद साधला. ग्रामस्थांच्या अडचणी जाणून घेत त्या सोडवण्यासाठी आणि विकासात्मक कामांना गती देण्यासाठी आपण सदैव कटिबद्ध राहू, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. या प्रवेशामुळे पक्ष संघटना अधिक मजबूत होईल, असेही त्यांनी नमूद केले.
नवनिर्वाचित सावर्डे जिल्हा परिषद सदस्या पुजा निकम यांनीही प्रवेशकर्त्यांचे स्वागत करत पक्षवाढीसाठी शुभेच्छा दिल्या. तसेच कोकरे जि.प. गट सदस्य संजय कदम यांनीही ग्रामस्थांचे स्वागत करून भविष्यात विकासकामांबाबत ठामपणे पाठीशी उभे राहण्याचा शब्द दिला.
या कार्यक्रमास राष्ट्रवादी तालुका उपाध्यक्ष दत्ताराम गुजर, आरडीसीसी संचालक राजेंद्र सुर्वे, सरपंच पंकज साळवी, सुधीर राजेशिर्के, निलेश खापरे यांच्यासह कोकरे जिल्हा परिषद गटातील पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
हा प्रवेश केवळ राजकीय बदल नसून विकासाच्या दिशेने उचललेले ठोस पाऊल असल्याची भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली. आमदार शेखर निकम यांच्या नेतृत्वाखाली परिसराच्या सर्वांगीण विकासाला नवी दिशा मिळेल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.




