गावखडी श्री स्वामी समर्थ मठात प्रगट दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन

रत्नागिरी : तालुक्यातील गावखडीतील श्री स्वामी समर्थ मठात प्रगट दिनानिमित्त भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
१९ मार्च रोजी सायंकाळी ५.३० वाजता मठामध्ये स्वामी नाम ज्योत प्रज्वलन, २० मार्च रोजी श्री स्वामी समर्थ प्रगट दिनानिमित्त पहाटे ५.३० वाजता काकड आरती, सकाळी ७ वाजता श्री स्वामी समर्थ पूजन, स्वामी पादुकांवर अभिषेक, सकाळी १० वाजता सामुदायिक नामजप, त्यानंतर श्री स्वामी नाम जप यक्ष, दुपारी १२ वाजता सद्गुरू प्रवचन होईल. त्यानंतर १२.३० वाजता महानैवेद्य अर्पण केला जाणार असून, महाआरती होईल. दुपारी १ वाजता महाप्रसादाचे वाटप केले जाईल. सायंकाळी ७ वाजता मठाच्या प्रांगणात पालखी प्रदशिणा, रात्री ८ वाजता नित्याची आरती, २१ मार्च रोजी दुपारी १२ वाजता महानैवेद्य, महाआरती, महाप्रसाद होईल. दुपारी ४ वाजता गांवखडी मठ पालखी सोहळा प्रारंभ होईल.
या कार्यक्रमांचा लाभ भाविकांनी घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button