ईगल तायक्वांदोतर्फे महर्षी कर्वे महिला महाविद्यालयातील मुलींना स्वरंक्षण प्रशिक्षण

रत्नागिरी : ईगल तायक्वांदोच्या प्रशिक्षिका संकेता संदेश सावंत यांनी दिलेले स्वसंरक्षणाचे प्रशिक्षण मुलींचा आत्मविश्वास वाढवणारे ठरले असे प्रतिपादन महर्षी कर्वे महिला महाविद्यालयाच्या प्राचार्यांनी केले.
शिरगाव इथल्या महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या महर्षी कर्वे महिला महाविद्यालय रत्नागिरी यांच्या एनएसएस विभागाच्यावतीने संपूर्ण महाविद्यालयाच्या मुलींसाठी महिला दिनाचे औचित्य साधत स्वसंरक्षण प्रशिक्षण वर्ग आयोजित करण्यात आला होता. यावेळी ईगल तायक्वांदो सेंटर अभ्युदयनगरच्या प्रशिक्षिका संकेता संदेश सावंत यांनी उपस्थित मुलींना संकट काळात स्वतःच संरक्षण करण्यासाठी कोणत्या छोट्या छोट्या युक्त्या वापरायच्या याचं प्रात्यक्षिक दाखवले. उपस्थित मुलींकडून ते प्रात्यक्षिक करूनही घेतले. योग्य पद्धतीने बांधलेला पंच आणि योग्य पद्धतीने मारलेली किक स्वतःच संरक्षण करण्यासाठी कशी उपयुक्त ठरू शकते याचेही प्रात्यक्षिक यावेळी देण्यात आले.
अलीकडच्या काळात महिलांना कामाच्या निमित्ताने वेगवेगळ्या वेळेला घराबाहेर पडावे लागते. एखाद्या संकटकालीन वेळी एकटच असताना केवळ हात आणि पायांचा योग्य पद्धतीने वापर करून कशाप्रकारे स्वतःची सुटका करून घेता येऊ शकते याचा प्रत्यक्ष अनुभव या मुलींनी या प्रात्यक्षिकांमध्ये घेतला. ईगल तायक्वांदो सेंटर अभ्युदयनगरच्या प्रशिक्षिका संकेता सावंत यांनी केलेले हे मार्गदर्शन अत्यंत मौल्यवान आणि उपयुक्त असल्याचे मत यावेळी सहभागी झालेल्या सर्व मुलींनी व्यक्त केले.
नाचणे रोड अभ्युदय नगर येथे सुरू असलेल्या प्रशिक्षण वर्गात ईगल तायक्वांदोच्या प्रशिक्षिका संकेता सावंत आणि सहप्रशिक्षिका सई सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली खेळाडू घडत असून बेल्ट एक्झाम तसेच वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये उत्तम यश मिळवत आहेत. कोणत्याही वयोगटातील मुली अथवा महिला तसेच मुलानाही या खेळाचे प्रशिक्षण घ्यायचे असल्यास अभ्युदय नगर बहुउद्देशीय सभागृहातील सुरू असलेल्या ईगल तायक्वांदो सेंटरच्या प्रशिक्षणवर्गाचा अवश्य लाभ घ्यावा, असे आवाहन प्रशिक्षिका संकेता संदेश सावंत यांनी यावेळी संवाद साधताना केले आहे. या कार्यक्रमाच्या वेळी उपस्थित महाविद्यालयाचे सर्व प्राध्यापक कर्मचारी प्राचार्य यांनीही अशा प्रशिक्षणाची अत्यंत गरज असल्याचे आवर्जून नमूद केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button