अखेर युद्ध समाप्त होणार? होर्मुझची सामुद्रधुनी खुली करण्याचा इराणचा प्रस्ताव; अमेरिकेसमोर ठेवली अट, तेलाचे दर घसरले!

Iran offers Strait of Hormuz reopening deal to US : अमेरिकेने लष्करी दबाव कमी केल्यास आणि इराणच्या बंदराजवळ उभारलेली नौदलाची तटबंदी खुली केल्यास होर्मुझची सामुद्रधुनी सात दिवसांत खुली करण्याचा प्रस्ताव इराणने ठेवला आहे.

रॉयटर्सशी बोलताना इराणच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने ही नवी माहिती दिली. न्यूयॉर्कमध्ये सुरू असलेल्या संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत (UNGA) सहभागी होण्यासाठी इराणचे शिष्टमंडळ पोहोचलेले आहे. अमेरिकेशी संबंध सुधारण्यासाठी शिष्टमंडळाला पूर्ण अधिकार देण्यात आले आहेत, अशीही माहिती मिळत आहे.

रॉयटर्सने दिलेल्या वृत्तानुसार इराणच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, राजनैतिक मार्गाने हा विषय सोडवायचा असल्याचे अमेरिकेने अधिकृतरित्या जाहीर करावे. त्यानंतर ही प्रक्रिया पुढे नेण्यासाठी कालबद्ध कार्यक्रम ठरवावा. न्यूयॉर्कमध्ये सध्या संयुक्त राष्ट्राची महासभा सुरू असून त्यात सहभागी झालेल्या इराणच्या शिष्टमंडळाला पूर्ण अधिकार देण्यात आलेले आहेत. तेहरानने मध्यस्थाच्या मार्फत १६ सप्टेंबर रोजी सदर प्रस्ताव दिला असल्याचेही या अधिकाऱ्याने म्हटले.

तेलाच्या किमती घसरल्या

इराणकडून होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा सुरू करण्याची तयारी दर्शवल्यानंतर जागतिक स्तरावर कच्च्या तेलाच्या पुरवठ्याची चिंता कमी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मंगळवारी कच्च्या तेलाच्या दरात ३ टक्क्यांची घसरण पाहायला मिळाली. कच्च्या तेलाचे दर प्रति बॅरल ९८ डॉलर्सवर आले आहेत.

दरम्यान इराणचा प्रस्ताव अमेरिकेलाही कळवण्यात आल्याचे एका इराणी अधिकाऱ्याने क्योडो न्यूजला सांगितले. तसेच या प्रस्तावामध्ये शत्रुत्व कायमस्वरुपी संपुष्टात आणण्याच्या उद्देशाने चर्चा पुन्हा सुर करण्याचाही समावेश असल्याचे या अधिकाऱ्याने सांगितले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button