निवडणुकांची रणधुमाळी; चार राज्यांच्या विधानसभा निवडणुका जाहीर!


पीटीआय, नवी दिल्ली : पश्चिम बंगाल, तमिळनाडू, केरळ, आसाम या राज्यांमध्ये आणि पुद्दुचेरी या केंद्रशासित प्रदेशात राजकीय रणधुमाळीला सुरुवात झाली आहे. निवडणूक आयोगाने या राज्ये-केंद्रशासित प्रदेशाच्या विधानसभा निवडणुका रविवारी जाहीर केल्या. तमिळनाडू, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीमध्ये एका टप्प्यात, तर पश्चिम बंगालमध्ये दोन टप्प्यांमध्ये मतदान होणार आहे. ४ मे रोजी या निवडणुकांचा निकाल लागणार आहे.

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी नवी दिल्लीत पत्रकार परिषद घेऊन चार राज्ये व एका केंद्रशासित प्रदेशाच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला. निवडणुका जाहीर झाल्यानंतर या राज्ये-केंद्रशासित प्रदेशात आचारसंहिता लागू झाली. निवडणुका हिंसाचार आणि प्रलोभनापासून मुक्त असाव्यात. आचारसंहिता आणि नियमांचे उल्लंघन करणार्‍यांविरोधात निवडणूक आयोग कठोर कारवाई करेल, असा इशारा कुमार यांनी दिला.

काँग्रेसची निवडणूक आयोगावर टीका

निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होण्यापूर्वी काँग्रेसने निवडणूक आयोगावर टीका केली. निवडणूक आयोगाचा उल्लेख मोदींची प्रचार संहिता (एमसीसी) असा केला. निवडणूक आयोग पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रचार संहितेचे प्रतिनिधित्व करत आहे. बदनामी, गैरवापर, धमकी, भीती परवण्याचे काम ही संस्था करते, अशी टीका काँग्रेसने केली.

२९४ पश्चिम बंगाल-मतदान : २३,२९ एप्रिल

१२६ आसाम- मतदान : ९ एप्रिल

३३पुद्दुचेरी- मतदान : ९ एप्रिल

१४० केरळ- मतदान : ९ एप्रिल

२३४ तमिळनाडू-मतदान : २३ एप्रिल

४ मे-मतमोजणी

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button