
जाकादेवी-निवळी मार्गावरील खड्डे कधी बुजवले जाणार?
निवळी-तरवळ-करबुडे -जाकादेवी मुख्य मार्गावर पडलेले खड्डे प्रशासनाच्या माध्यमातून लवकरच बुजवावे आणि सर्वसामान्य प्रवासी व वाहनचालकांना दिलासा मिळावा, यासाठी प्रवासी व वाहन चालकांनी प्रशासनाकडे लक्ष वेधले आहे.
या रस्त्यावरील काही खड्डे गेल्या आठवड्यापूर्वी कच्च्या स्वरुपात बुजवले गेले होते. मात्र दोन तीन वेळा जोराचा पाऊस पडल्यानंतर छोटे खडक व मातीने तात्पुरते बुजवलेले रस्त्यावरील खड्डे हे पुन्हा पाण्याने भरले असून वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे.




