रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष पदी मंडणगड येथील सौ. अस्मिता केंद्रे तर उपाध्यक्षपदी संगमेश्वर येथील विलास चाळके यांची नावे जाहीर


रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष पदी मंडणगड येथील सौ. अस्मिता केंद्रे तर उपाध्यक्षपदी संगमेश्वर येथील विलास चाळके याची नाव पालकमंत्री उदय सामंत यांनी जाहीर केले.
मंडणगडच्या अस्मिता केंद्रे होणार जिल्हा परिषद अध्यक्ष..!!

अस्मिता अनंत केंद्रे जिल्हा परिषद गट -1 भिंगळोली यांना रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी संधी मिळणार आहे.

तीन वर्षापूर्वी शिवसेनेत आलेल्या अस्मिता केंद्रे या गेली 2 टर्म म्हणजे 10 वर्षे या जिल्हा परिषद गटातून निवडून येत आहेत.ही तिसरी टर्म आहे.
पालकमंत्री उदय सामंत यांनी यावेळी अध्यक्षपद हे उत्तर रत्नागिरी ला मिळणार असल्याचे म्हटले होते.गृह राज्यमंत्री योगेश कदम यांनी आपल्या मतदारसंघातील मंडणगडच्या अस्मिता केंद्रे यांची निवड अध्यक्ष पदासाठी केली आहे.
जिल्हा परिषदेचे संपूर्ण माहिती असणाऱ्या जिल्हा परिषद अध्यक्ष पद भूषवलेले विलास चाळके यांनाही उपाध्यक्षपदी संधी दिली आहे यापूर्वीही विलास चाळके यांनी जिल्हा परिषदेमध्ये चांगले काम केले होते

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button