
खेर्डीतील ’त्या’ कंपनीला ४२ हजारांचा दंड, वाशिष्ठी नदीतून बेकायदा पाणी उपसा भोवले!
चिपळूण तालुक्यातील औद्योगिक वसाहतीतील एका नामांकित कंपनीकडून वाशिष्ठी नदीतून गेल्या अनेक वर्षांपासून विनापरवाना पाणी उपसा केला जात असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याबाबत खेर्डीचे माजी उपसरपंच विजय शिर्के यांनी एमआयडीसी व जलसंपदा विभागाकडे केल्यानंतर जलसंपदा विभागाने पाहाणी केली. त्यामध्ये पाणी उपशाचा प्रकार आढळून आल्यानंतर संबंधित कंपनीला नोटीस देण्यात आली असून कंपनीकडून ४२ हजार ६५४ रुपयांचा दंड जमा करण्यात आला आहे. मात्र १० ते १५ वर्षे सुरू असलेल्या या प्रकारावर केवळ एवढीच आरोप कारवाई झाल्याने ती तकलादू असल्याचा स्थानिकांनी केला आहे.
www.konkantoday.com




