
बेकायदेशीर जमावप्रकरणी रसाळगड येथे ७ जणांवर गुन्हा
खेड तालुक्यातील रसाळगड-झापाडीवाडी येथे बेकायदेशीर जमाव करत एकास लाठ्याकाठ्यांसह लाथाबुक्क्यांनी मारहाण करून ठार मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी ७ जणांवर येथील पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या मारहाणीत संजय रामचंद्र घाग जखमी झाले.
अनंत तुकाराम घाग, भागोजी तुकाराम घाग, समीर भागोजी घाग, जितेश अनंत घाग, आदेश अनंत घाग, रितेश अनंत घाग, कृष्णा अनंत घाग (सर्व रा. रसाळगड-
झापाडीवाडी) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याबाबत सुवर्णा संजय घाग (रा. रसाळगड-झापाडीवाडी) यांनी येथील पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे.
सशयितांनी फिर्यादी यांच्या सामायिक जागा जमिनीसह घरगुती वादाचा राग मनात ठेवत बैठक घेण्याच्या उद्देशाने त्यांच्या घरी येऊन पती संजय रामचंद्र घाग यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण करून शिवीगाळ व ठार मारण्याची धमकी दिल्याचे तक्रारीत नमूद केले आहे. ही घटना १० मार्च रोजी रात्रीच्या सुमारास घडल्याचेही तक्रारीत म्हटले आहे.
www.konkantoday.com




