ओणी पाचल-अणुस्कुरा मार्गावरून पाचल आठवडा बाजाराजवळ पुन्हा अपघात


ओणी पाचल-अणुस्कुरा या महत्त्वाच्या मार्गावर गेल्या काही वर्षांत वाहतुकीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. कोकणातून पश्चिम महाराष्ट्राकडे जाणार्‍या वाहनांसाठी हा मार्ग पर्यायी आणि सोयीस्कर मानला जात असल्याने दिवसभर या मार्गावर चारचाकी, दुचाकी तसेच मालवाहतूक वाहनांची वर्दळ वाढलेली असते. मात्र वाढत्या वाहतुकीच्या पार्श्वभूमीवर रस्त्याची योग्य देखभाल आणि दुरुस्ती करण्यात सार्वजनिक बांधकाम विभागाकडून दुर्लक्ष होत असल्याची तक्रार स्थानिक नागरिकांकडून वारंवार केली जात आहे.
या मार्गावरील नवीन रस्त्यावर काही ठिकाणी खड्डे पडले आहेत. त्यामुळे वाहनचालकांना गाडी चालवताना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. विशेषतः रात्रीच्या वेळी या खड्ड्यांचा अंदाज येत नसल्याने अपघात होण्याचा धोका अधिक वाढला आहे. पाचल येथील आठवडा बाजार परिसरात तर ही समस्या अधिक गंभीर झाली आहे. गेल्या तीन दिवसात या ठिकाणी दोन वाहनाचे अपघात होऊन गाड्याचे नुकसान झाले आहे.www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button