
रत्नागिरी जिल्ह्यात उष्णतेची लाट हवामान विभागाचा इशारा
*भारतीय हवामान विभागाने (IMD) रत्नागिरी जिल्ह्यासह कोकण किनारपट्टीवर १० मार्च २०२६ पासून पुढील ३-४ दिवस उष्ण आणि दमट हवामानाचा इशारा दिला आहे
वाढत्या तापमानामुळे रत्नागिरीत कमाल तापमान सरासरीपेक्षा ३ ते ५ अंशांनी वाढून ३८°C पर्यंत जाण्याची शक्यता आहे, ज्यामुळे नागरिकांनी दुपारी बाहेर जाणे टाळावे, असे आवाहन करण्यात आले आहे .
*रत्नागिरीतील उष्णतेच्या लाटेसंदर्भात प्राप्त महत्त्वाच्या माहितीनुसार कोकण पट्ट्यात, विशेषतः रत्नागिरीत, दमट हवेमुळे उष्णतेचा त्रास अधिक जाणवणार आहेतापमान वाढ होणार आहे.कमाल तापमानात ३ ते ५ अंश सेल्सिअसची वाढ अपेक्षित असून, ते ३७-३८°C पर्यंत पोहोचू शकते [
प्रशासकीय तयारी: वाढत्या उष्णतेमुळे आरोग्य विभागाला सतर्क राहण्याचे निर्देश दिले असून, ग्रामीण रुग्णालयांत ‘हीट स्ट्रोक रूम’ (उष्णताघात कक्षा) सज्ज करण्यात बाबत सूचना देण्यात आल्या असल्याची माहिती प्राप्त होत आहे.
नागरिकांनी दुपारी १२ ते ४ या वेळेत थेट सूर्यप्रकाशात जाणे टाळावे.भरपूर पाणी, लिंबू सरबत किंवा नारळ पाणी प्यावे.
सुती आणि हलक्या रंगाचे कपडे वापरावेत.
बाहेर पडताना डोके झाकण्यासाठी टोपी किंवा रुमालाचा वापर करा .
उष्णतेची लाट पाहता, नागरिकांनी विशेषतः ज्येष्ठ नागरिक, मुले आणि आजारी व्यक्तींनी दुपारी बाहेर जाणे टाळावे, असे आवाहन हवामान विभागाकडून करण्यात आले आहे .



