“श्रीमान” कथासंग्रहाला राज्यस्तरीय साहित्यरत्न पुरस्कार प्रदान


माहेर संस्थेच्या वतीने दुर्गेश आखाडे यांच्या “श्रीमान” कथासंग्रह राज्यस्तरीय साहित्यरत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला.माहेर संस्थेच्या २९ व्या वर्धापन दिनी हा पुरस्कार वितरण सोहळा पार पडला.
मे २०२४ मध्ये प्रकाशित झालेल्या श्रीमान या कथासंग्रहाला राज्यस्तरीय साहित्यरत्न पुरस्कार जाहीर झाला.हा पुरस्कार ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या श्रध्दा कंळबटे यांच्या हस्ते “श्रीमान” कथासंग्रहाचे लेखक दुर्गेश आखाडे यांना प्रदान करण्यात आला.

यावेळी ज्येष्ठ पत्रकार राजेंद्रप्रसाद मुसरकर,माहेर संस्थेच्या विश्वस्त शर्लिन दीदी,निवृत्त प्राचार्य डॉ.सुरेश नाईक,जि.प.सदस्य ॲड.महेंद्र मांडवकर,हर्षदा गावडे,पं.स.सदस्या विद्या बोंबले,सरपंच तन्वी कोकजे,जिल्हा बाल संरक्षण अधिकारी समृद्धी वीर,सुनील कांबळे,भिकाजी गावडे व इतर मान्यवर उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button