आर एच पी फाउंडेशनच्या माध्यमातून दिव्यांग व्यक्तींना मिळाली निओ मोशनच्या यांत्रिक व्हीलचेअर

. अती तीव्र दिव्यांग व्यक्ती म्हटली की डोळ्यासमोर येते ती दुसऱ्यावर अवलंबून असणारी व्यक्ती.आणि त्यामुळे संपूर्ण कुटुंब दिव्यांग होत.पण या संकल्पनेला स्वतः दिव्यांग असणारे सादिक नाकाडे यांनी छेद दिला स्वतः स्वतःची सर्व कामे स्वतः करत असताना आपल्या सारख्या इतर दिव्यांग व्यक्तींना ही त्यांनी जीवनाच्या प्रवाहात आणले आहे.आणि आज त्यांच्यासारखे इतर असंख्य दिव्यांग बांधव मानाने जगत आहेत.नवनवीन व्यवसाय आणि नोकरी करत आहेत.आज दिव्यांग व्यक्ती कुटुंबावर भार न होता आधार बनत आहे.यासाठीच कायम पुढाकार घेऊन स्वतः एकटे दिव्यांगासोबत मुंबईला जाऊन वेगवेगळ्या संस्थांच्या मदतीने त्यांना निओ मोशन च्या इलेक्ट्रिक व्हील चेअर गाड्या मिळवून देत आहेत.

यातच आता त्यांनी आपल्याकडील दिव्यांग स्मिता पद्माकर पाटील(पोलिओ दिव्यांग), भंडारपुळे,रत्नागिरी , वरुण विश्वनाथ गोसावी(पॅराप्लेजिक दिव्यांग),भांबेड,लांजा व सुवर्णा दामले(पॅराप्लेजिक दिव्यांग) यांना
आर एच पी फाऊंडेशन रत्नागिरीचे संस्थापक व अध्यक्ष सादिक नाकाडे यांनी स्पॉन्सर इंनर व्हील क्लब ऑफ बॉम्बे मिडटाऊन आणि ऑर्गनिझ ऑफ नॅशियो संस्था ,चेंबूर यांच्या सहकार्याने निओ मोशन ची इलेक्ट्रिक व्हील चेअर मिळवून दिल्या.त्यामुळे या दिव्यांगांच्या आयुष्यात अमुलाग्र बदल होणार आहे.त्यांना कोणाच्याही सहकार्याशिवाय बाहेर जाता येणार आहे.आणि स्वतःसाठी नोकरी किंवा व्यवसाय करता येणे शक्य होणार आहे.
सदर व्हील चेअर वाटपसमयी स्वतः नाकाडे सर,स्मिता पाटील,स्वानंदी पाटील, सुवर्णा दामले,वरुण गोसावी,इंनर व्हील क्लब ऑफ बॉम्बे मिडटाऊनचे पदाधिकारी ज्योतिका प्रेमनारायणे,लक्ष्मी सिंग, हिरु थंडानी,ज्योती मणिपाल उपस्थित होते.

त्याशिवाय सादिक सर यांच्या कष्टाचे चीजच म्हणावे लागेल की आता आपल्याकडेही निओ मोशनच्या सहकार्याने दिव्यांग बांधवांचे मोजमाप शिबिर झाले आहे.त्यामुळे लवकरच रत्नागिरी जिल्ह्यात 30 दिव्यांग बांधवांना निओ मोशनच्या इलेक्ट्रिक व्हील चेअर गाड्या मिळणार आहेत.ज्यांना अजूनही अशा गाड्यांची आवश्यकता आहे अशांनी आर एच पी फाउंडेशनच्या नाकाडे सर यांच्या मोबाईल क्रमांक 8329534979 यावर संपर्क साधावा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button