
दापोली तालुक्यातील पंचनदीमध्ये घरफोडी करून ७ लाखाचा ऐवज लंपास
दापोली तालुक्यातील पंचनदी कुणबीवाडी येथील मानसी महेंद्र नाचरे यांच्या घरातून अज्ञात चोरट्याने सुमारे ७नाख ५ हजार रुपयाचा ऐवज लंपास केल्याची घटना २२ फेब्रुवारी रोजी दुपारी १२ ते सायंकाळी ७ वाजण्याच्या मुदतीत घडली.
दाभोळ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मानसी नाचरे यांच्या घराच्या मागील दरवाजातून अज्ञात चोरट्याने घरामध्ये प्रवेश केला घरामध्ये असणारे लोखंडी कपाट कोणत्यातरी हत्याराने खोलून कपाटाची तिजोरी फोडून त्यामध्ये स्टीलच्या किटली व प्लास्टिकच्या डबीत ठेवलेले सुमारे ७ लाख ५ हजार रुपयाचे दागिने व पैसे चोरून नेले.
www.konkantoday.com




