
सेवा शक्ती संघर्ष एसटी कर्मचारी संघ महाराष्ट्र राज्य यांची रत्नागिरी जिल्हा कार्यकारणी जाहीर..
रत्नागिरी : मा. आमदार गोपीचंद पडळकर तसेच मा. आमदार सदाभाऊ खोत यांच्या मार्गदर्शनाखाली मा. सतिशदादा मेटकरी (सरचिटणीस), मा. प्रकाशदादा कांबळे (केंद्रिय उपाध्यक्ष) यांच्या नेतृत्वात सेवाशक्ती संघर्ष एस.टी. कर्मचारी संघ, रत्नागिरी विभागाची सन २०२६ सालाकरीता कार्यकारणीची निवड करण्यात आली.
कर्मचारी हिताकरीता अमुल्य साथ मिळावी व कामगार हिताचे निर्णय घेऊन कर्मचारी यांना सहकार्य करावे यासाठीच सेवा शक्ती संघर्ष एसटी कर्मचारी संघ काम करत आहे. २०२६ ची रत्नागिरी जिल्हा कार्यकारिणी काल विभाग नियंत्रक रत्नागिरी यांच्याकडे देण्यात आली. यामध्ये जिल्हा अध्यक्ष पदी श्री. संतोषजी बोरकर , उपाध्यक्ष- श्री. योगेशजी भोसले, श्री. संजिव बने, श्री. तेजस रायबागकर (राजापूर आगार) यांच्यासह विधीतज्ञ म्हणून श्री. ॲड. संकेत लकेश्री, सचिव श्री. वसंत कांबळे (लांजा आगार), सहसचिव श्री. सतिश चव्हाण (गुहागर आगार), खजिनदार श्री. अक्षय मांडवकर (विभागीय भांडार),
सह खजिनदार श्री. विलास मोरे (मंडणगड आगार), कार्याध्यक्ष- श्री. जयप्रकाश दळवी (वि.का.शा), जिल्हा संघटक- श्री. विजय गोरे (वि.का.शा)प्रसिध्दी सचिव- श्री. महेंद्र विखारे (मंडणगड आगार), महिला संघटक- सौ. दुर्गा मोर्लेकर (राजापूर आगार), संघटक सचिव- श्री. अंकुश शिंदे (लांजा आगार), कार्यकारिणी सदस्य श्री. मंगेश गोवळकर (वि.का.शा), श्री. वेताळ चव्हाण (गुहागर), श्री. शशिकांत कांबळे (वि.का.शा), श्री. संतोष आबादार (विभागीय भांडार), श्री. संतोष आरवकर (भाजपा) श्री, निलेश महादेव आखाडे (भाजपा) यांची निवड कार्यकरणीत करण्यात आली. सर्व स्तरातून पदाधिकारी यांचे अभिनंदन केले जात आहे.
विभाग नियंत्रक रत्नागिरी यांना कार्यकारणीची प्रत देत काही प्रश्नांवर चर्चा करण्यात आली. विभाग नियंत्रक यांनी देखील नवीन नियुक्त पदाधिकारी यांना शुभेच्छा दिल्या. कर्मचारी यांच्या हितासाठी, त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी संघटना मजबुतीने काम करेल असा विश्वास नियुक्त पदाधिकारी यांनी व्यक्त केला.



