रत्नागिरी जिल्हा नगरवाचनालयाचा मुंबई महानगरीत झालेला सन्मान हा सुसंस्कृत रत्नागिरीच्या लोकमानसाचा सन्मान – ॲड.दीपक पटवर्धन


दि.२६ फेब्रुवारी रोजी मास्टर दिनानाथ मंगेशकर नाट्यगृहात झालेल्या शानदार कार्यक्रमात रत्नागिरी जिल्हा नगर वाचनालयाला सामाजिक कृतज्ञता पुरस्काराने सन्मानित करण्यात आल. कै.शोभाताई केळकर यांच्या सामाजिक कार्याचा स्मृती कलश प्रेरणारूपाने अविरत भरलेला रहावा यासाठी हा पुरस्कार प्रतिवर्षी दिला जातो. यावर्षी १९८ वर्ष ग्रंथालयाचे काम करणाऱ्या महाराष्ट्रातील सर्वात जुन्या रत्नागिरी जिल्हा नगर वाचनालयाला हा सन्मान देऊन गौरविण्यात आले. ज्येष्ठ गायिका आशाताई खाडीलकर यांच्या हस्ते वाचनालयाचे अध्यक्ष ॲड.दीपक पटवर्धन यांनी हा सन्मान स्विकारला. २१ हजाराचा धनादेश व सन्मानपत्र असे या कृतज्ञता पुरस्काराचे स्वरूप होते. अटल सेवा केंद्राचे अध्यक्ष सुनील मोने यांनी प्रास्तविकात नगर वाचनालयाचे कार्याचा आढावा घेतला आणि ग्रंथालय क्षेत्रात काम करणाऱ्या या संस्थेची निवड करता आली याबद्दल आनंद व्यक्त केला.
आशाताई खाडीलकर यांनीही या वाचनालयाला स्वा.सावरकरांचा सहवास लाभला आहे, प्रचंड ग्रंथसंपदा ह्या वाचनालयात आहे आणि १९८ वर्ष हे काम उत्तमपणे सुरू आहे यातच सर्व येत अशा वाचनालयाच्या अध्यक्षांना सन्मानीत करतांना मनापासून आनंद होतो अशी भावना त्यांनी बोलून दाखवत वाचनालयाचा गौरव केला.
रत्नागिरीकरांच्या सुसंस्कृत समाज रचनेच फलित म्हणून इतका प्रदीर्घ काळ हे वाचनालय उत्तम पद्धतीने चालले. आपण या महानगरात केलेला वाचनालयाचा हा सन्मान रत्नागिरीच्या सुसंस्कृत लोकमानसाचा आहे असे सत्काराला उत्तर देताना ॲड.दीपक पटवर्धन यांनी आवर्जून नमूद करत वाचनालया संदर्भातील जुने संदर्भ आणि घटना यांचे आपल्या शैलीत वर्णन करून उपस्थित श्रोत्यांसमोर वाचनालय साकार केले. या कार्यक्रमाला नगरसेविका मा. अंजली सामंत, जनकल्याण संस्थेचे अध्यक्ष संतोष केळकर, सुनील मोने, अटल सेवा केंद्राचे अभिजीत सामंत यांचेसह अनेक मान्यवर मोठ्या संख्येने पार्लेकर श्रोतृवर्ग त्यातही मूळ रत्नागिरीकर असलेले पार्लेकर यांनीही उत्स्फूर्त उपस्थिती ठेवली होती.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button