रत्नागिरी शहरालगतच्या मिरजोळे एमआयडीसी येथे कर्जवसुलीसाठी गेलेल्या बँक कर्मचार्‍याला मारहाण, तिघांविरूद्ध गुन्हा दाखल


रत्नागिरी शहरालगतच्या मिरजोळे एमआयडीसी येथे कर्जवसुलीसाठी गेलेल्या बँक कर्मचार्‍याला शिवीगाळ व दमदाटी करत मारहाण केल्याचा प्रकार समोर आला आहे. ही घटना दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास घडली. लक्ष्मण गणु म्हात्रे असे मारहाण करण्यात आलेल्या बँक कर्मचार्‍याचे नाव आहे.
याप्रकरणी ग्रामीण पोलिसांनी तिघा संशयितांविरुद्ध मारहाण केल्याप्रकरणी भारतीय न्याय संहिता तसेच ऍट्रॉसिटी कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे.
अल्ताफ संगमेश्वरी, हिदायद इस्माईल वस्ता व हनिफ हिदायद वस्ता अशी गुन्हा दाखल करण्यात गुन्ह्यातील माहितीनुसार हिदायद वस्ता याने बँकेतून कर्ज घेतले होते. या कर्जाची वसुली करण्यासाठी २४ फेब्रुवारी रोजी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास लक्ष्मण म्हात्रे हे आपल्या पथकास वस्ता याच्या मिरजोळे एमआयडीसी येथील घरी गेले होते. कर्ज वसुलीसाठी आलेल्या पथकाशी वस्ता हा वाद घालू लागले. वाद सुरु असताना त्याठिकाणी अल्ताफ संगमेश्वरी आला. यावेळी संशयित आरोपीनी म्हात्रे यांना दमदाटी, शिवीगाळ व मारहाण केली अशी तक्रार रत्नागिरी ग्रामीण पोलिसांत दाखल करण्यात आली आहे.www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button