महर्षी कर्वे बीसीए महाविद्यालयातील विद्यार्थिनींची BNY, पुणे येथे औद्योगिक भेट रेझ्युमे व लिंक्डइन प्रशिक्षणातून करिअरला नवी दिशा


महर्षी कर्वे महिला महाविद्यालय रत्नागिरीच्या बीसीए विभागातील अंतिम वर्षातील २८ विद्यार्थिनींनी दिनांक १३ फेब्रुवारी २०२६ रोजी पुणे येथील बँक ऑफ न्यूयॉर्क (BNY), खराडी येथे औद्योगिक भेट दिली. तसेच विद्यार्थिनींनी भेटी दरम्यान ’रेझ्युमे बिल्डिंग व लिंक्डइन ऑप्टिमायझेशन’ या विशेष प्रशिक्षण सत्रात सहभाग घेतला. हा उपक्रम महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्था, सेंटर फॉर स्किल डेव्हलपमेंट, पुणे यांच्या सहकार्याने आयोजित करण्यात आला होता.
BNY Company    ही न्यूयॉर्क शहरात मुख्यालय असलेली अमेरिकन आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा कंपनी आहे. न्यूयॉर्क स्टॉक एक्स्चेंजवर सूचीबद्ध होणारी BNY   पहिली कंपनी होती व अमेरिकेतील तीन सर्वात जुन्या बँकांपैकी एक आहे.
२०२४ मध्ये एकूण महसुलानुसार अमेरिकेतील सर्वात मोठ्या कंपन्यांच्या फॉर्च्यून ५०० यादीत तिचा १३०वा क्रमांक लागला होता. अश्या जगविख्यात बँकेच्या आशिया पॅसिफिक क्षेत्रामधील भारतातील पुणे खराडी येथील ऑफिसला विद्यार्थिनींनी भेट दिली.
सकाळी १०.३० ते दुपारी १.३० या वेळेत पार पडलेल्या सत्राची सुरुवात विद्यार्थ्यां मधील ताण कमी करण्यासाठी एका मनोरंजक उपक्रमाने झाली. त्यानंतर बीएनवाय पुणे येथील वरिष्ठ अधिकारी यांनी विद्यार्थिनींना सत्राचा उद्देश व औद्योगिक अपेक्षा यांची माहिती दिली.
सदरच्या सत्रामध्ये BNY company चे ऑपरेशन्स विभाग व्हाईस प्रेसिडेंट श्री. भाऊसाहेब वाघमारे यांनी कंपनीची कार्यप्रणाली व आपल्या सहकार्‍यांची ओळख सर्वाना करून दिली.
बीएनवाय पुणे येथील वरिष्ठ अधिकार्‍यांनी रेझ्युमे बिल्डिंग सत्रामध्ये रेझ्युम मधील आव्यशक घटक, योग्य मांडणी, करिअर मधील रेझ्युमेचे महत्व संबंधी मार्गदर्शन केले.
लिंक्डइन सत्रामध्ये श्री. जिंतेन्द्र तलरेजा, श्री. अंकित अगरवाल यांनी लिंक्डइन प्रोफाइल अचूक, विविध स्किलची माहिते देणारे कसे तयार करावे यासंबंधी मार्गदर्शन केले.
या औद्योगिक भेटीद्वारे विद्यार्थ्यांना बहुराष्ट्रीय कंपनीतील कार्यसंस्कृती, शिस्त, सुरक्षा व्यवस्था व आधुनिक पायाभूत सुविधा यांचा प्रत्यक्ष अनुभव घेता आला. कंपनीच्या भव्य कार्यालयीन वातावरणाने वि?द्यार्थी प्रभावित झाले असून भविष्यात अशा प्रतिष्ठित कंपनीत कार्य करण्याची प्रेरणा त्यांना मिळाली.
या औद्योगिक भेटची पूर्व तयारीसाठी ९ फेब्रुवारी ते १२ फेब्रुवारी पर्यत महर्षी कर्वे संस्थेच्या सेंटर फॉर स्किल डेव्हलपमेंट, पुणे येथील शिक्षकांनी विद्यार्थिनींना सॉफ्ट स्किल्स, वर्तणूक, एटीकेट्स, संभाषण कौशल्य, इ. संबंधी मार्गदर्शन केले.
महाविद्यालयात राबविण्यात येणार्‍या अश्याप्रकारच्या विविध उपक्रमामुळ्ये विद्यार्थिनींच्या सर्वांगीण विकासामध्ये नेहमीच उपयोग झाला आहे.
सदर उपक्रम यशस्वीरित्या पूर्ण करण्यासाठी संस्थेचे कार्याध्यक्ष व रत्नागिरी प्रकल्पचे अध्यक्ष श्री. रवींद्र देव, सेक्रेटरी डॉ. पी. व्ही. एस. शास्त्री, महावि?द्यालयाच्या प्राचार्य स्नेहा कोतवडेकर, CSD ऍडमीन श्रुती दिघे, प्राध्यापक श्री. केतन पाथरे ट्रैनिंग ऍड प्लेसमेंट ऑफिसर, प्रा. कु. श्रुती यादव, शिक्षकेतर कर्मचारी या सर्वांचे मोलाचे सहकार्य लाभले. सदर उपक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या व्यावसायिक कौशल्यांमध्ये निश्चितच भर पडली असून त्यांच्या करिअर नियोजनाला नवी दिशा मिळाली आहे.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button