
कोकण मार्गावर रेल्वेच्या धडकेने तरूणाचा मृत्यू
कोकण मार्गावरून धावणार्या रेल्वेच्या धडकेने २५ ते ३० वयोगटातील तरूणाचा मृत्यू झाला. या मृत तरूणाची अद्यापही ओळख पटलेली नाही. या संदर्भात कोणाला काही माहिती असल्यास पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. हा तरूण रेल्वेगाडीने प्रवास करत असताना तोल जावून पडला. त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्याचा मृत्यू झाला होता. याबाबत रेल्वे सुरक्षा दलाचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक दिगंबर प्रेम सिंग यांनी येथील पोलीस ठाण्यात खबर दिली होती. त्यानुसार आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. या मृत तरूणाची उंची ५ फूट ५ इंच, रंग गोरा, चेहरा गोल, केस कापलेले काळ्या रंगाची फूल पॅन्ट, पांढर्या रंगाचा टी शर्ट परिधान केलेला आहे. याबाबत अधिक तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल ए. बी. शेख करत आहेत.
www.konkantoday.com




