
रत्नागिरी शहरातील राजिवडा येथील पुलाखाली बेशुद्धावस्थेतील खलाशाचा मृत्यू
रत्नागिरी शहरातील राजिवडा येथील पुलाखाली बेशुद्ध अवस्थेत सापडलेल्या खलाशाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. शंकर बकोरी यादव (२०, रा. राजिवडा, मूळ झारखंड) असे मृत खलाशाचे नाव आहे. ही घटना २० फेब्रुवारी रोजी सकाळी ११.३० ला घडली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार मृत शंकर यादव याने सकाळी साडेअकराच्या सुमारास बोट मालक महंमद हनीफ दाऊद बुड्ये (रा. राजीवडा) यांना गावाला जातो म्हणून सांगून गेला होता. तो सायंकाळी राजिवडा पुल येथे बेशुद्ध अवस्थेत आढळून आला होता.
www.konkantoday.com



