
सीए, करसल्लागारांच्या स्पोर्ट्स कार्निव्हलला प्रतिसाद
रत्नागिरी: सीए व करसल्लागारांच्या क्षेत्रात कामाची धावपळ असते, वेळेत काम करावेत लागते. या कामामुळे ताणतणाव येऊ शकतो. म्हणून आपण सर्वांनी क्रीडा संस्कृती जपत तब्बेत सांभाळणे व सुधारणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ सीए राजशेखर अॅंथोनी यांनी केले.
सीए इन्स्टिट्यूट रत्नागिरी शाखा आणि करसल्लागार असोसिएशनच्या रत्नागिरी शाखेतर्फे गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाच्या स्पोर्ट्स कार्निव्हलच्या बक्षीस वितरण सोहळ्यात ते बोलत होते. याप्रसंगी व्यासपीठावर एंजल ब्रोकिंगचे चॅनल पार्टनर राजेश सोहोनी, ए. यू. फायनान्सचे व्यवस्थापक संतोष भगत व अधिकारी सुबोध पवार, करसल्लागार असोसिएशनचे अध्यक्ष रमाकांत पाथरे, सीए इन्स्टिट्यूट रत्नागिरी शाखेचे अध्यक्ष सीए मंदार जोशी, गोगटे जोगळेकर महाविद्यालयाचे क्रीडा संचालक डॉ. विनोद शिंदे उपस्थित होते.
स्पर्धेचा सविस्तर निकाल असा- क्रिकेट विजेता- क्रेझी फोर, उपविजेता- सीए रॉकर्स. प्रत्येक सामन्यातील सामनावीर- प्रणव दामले, शैलेश काळे, अमित काटे, सौरभ लाड. भास्कर आंबेकर, अथर्व पंगेरकर, सुरेंद्र सुकडे. सर्वोत्कृष्ट गोलंदाज- पवन अवसरे, सर्वोत्कृष्ट फलंदाज- अमित काटे, मालिकावीर- अमित काटे (७२ धावा व ५ बळी).
बुद्धिबळ- वरद पेठे, साईप्रसाद साळवी, टेबलटेनिस एकेरी अभिजित पटवर्धन, शौनक भावे, टेबल टेनिस दुहेरी- अभिजित पटवर्धन व राजेश गांगण, आयेशा अघाडी व राजेश सोहोनी. कॅरम महिला एकेरी- स्नेहा भोसले, मिनल काळे, कॅरम पुरुष एकेरी शैलेश काळे, साईप्रसाद साळवी, कॅरम दुहेरी- शैलेश काळे, अभिजित बेर्डे, बॅडमिंटन पुरुष एकेरी- वरद पटवर्धन, रोहित अडाव, बॅटमिंटन महिला एकेरी- रिद्धी शेट्टी, रोशनी देसाई, बॅडमिंटन पुरुष दुहेरी- सौरभ लाड, मयुरेश जोशी, बॅडमिंटन महिला दुहेरी- आयेशा अघाडी व रिद्धी शेट्टी व सांची, रेणू. रिले ४X१०० पुरुष- विजेता अमित नेवरेकर टीम, हर्षद पटवर्धन टीम, रिले ४X१०० महिला- आयेशा अघाडी टीम, रश्मी आठवले टीम.




