
सार्वजनिक बांधकाम खात्याची धुरा भुसेंकडे, तर नगरविकासची जबाबदारी सामंतांना
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या जवळील खाती शिवसेनेतील इतर मंत्र्यांकडे तात्पुरत्या स्वरुपात देण्यासंबंधी पत्र जारी केलं आहे. त्यानुसार सार्वजनिक बांधकाम विभागाची धुरा दादा भुसे यांच्याकडे, तर नगरविकास मंत्रालयाची जबाबदारी उदय सामंत यांच्याकडे सोपवण्यात आली आहे.विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशन काळापुरती ही तजवीज करण्यात आली आहे.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतःकडे असलेली खाती तूर्तास पक्षातील इतर मंत्र्यांना देण्यासंबंधीचे पत्र विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना पाठवले आहे. त्यानुसार सार्वजनिक बांधकाम विभाग दादा भुसे यांच्याकडे, नगरविकास मंत्रालयाची जबाबदारी उदय सामंत यांना, तर गृहनिर्माण खात्याची धुरा शंभुराज देसाई यांच्यासकडे सुपूर्द करण्यात आली आहे. एबीपी माझा वृत्तवाहिनीने यासंबंधी बातमी दिली आहे
दोन्ही सभागृहात प्रश्न
अधिवेशन काळात एकनाथ शिंदे यांच्याकडील खात्यांसंबधी विरोधीपक्षांकडून येणाऱ्या प्रश्नांची उत्तरं आता जबाबदारी मिळालेले मंत्री देणार आहेत




