
गुहागर तालुक्यातील आरोगाव येथील विशाल गुरव यांनी १०३ दिवसात पायी पूर्ण केली नर्मदा परिक्रमा
गुहागर तालुक्यातील आरोगाव येथील विशाल गुरव याने १०३ दिवसात पूर्ण केली पायी नर्मदा परिक्रमा. हिंदू धर्मीयांची ही अध्यात्मिक यात्रा आपल्याला नर्मदामाईच्या कृपेने पूर्ण करता आली, अशी प्रतिक्रिया गुरव यांनी व्यक्त केली.
तालुक्यातील आरेगाव येथेच नोकरी करत असलेल्या विशाल गुरव याने या परिक्रमेबाबत बोलताना ३ नोव्हेंबर २०२५ रोजी ओंकारेश्वर येथून या नर्मदा परिक्रमेला पायी सुरूवात केली. या परिक्रमेतील सुपाणी आणि लखटकोट जंगल या कठीण मागाचा अनुभव मोठा होता. सुपाणी जंगलातील खपरमाळ हा अतिशय चढणीचा रस्ता होता. आश्रममधून आम्हाला स्वतःच्या जबाबदारीवर हा प्रवास करावयाचा होता अशा सूचना मिळाल्या होत्या. मात्र कोणताही मोठा प्रसंग न येता येथील जंगलातील प्रवास सुखरूप झाला. नर्मदा परिक्रमा ही हिंदू धर्मीय अध्यात्मिकता आहे.
www.konkantoday.com




