शरद पवारांची प्रकृती बिघडली; पुण्याच्या रुबी हॉल क्लिनिकमध्ये उपचार सुरू


राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांची प्रकृती पुन्हा बिघडली आहे. त्यामुळे त्यांना पुण्यातील रुबी हॉल क्लिनिक रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. गेल्या काही दिवसांपासून शरद पवारांना अशक्तपणा जाणवत आहे.त्यामुळे आता पुन्हा डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्यांना रुग्णालयात अॅडमिट करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शरद पवार यांना थकवा आणि अशक्तपणाचा त्रास जाणवत आहे. त्यामुळे त्यांची प्रकृती खालवली आहे. शरद पवार यांना रुग्णालयात दाखल केल्यानंतर पुढील काही मिनिटांतच त्यांना सलाईन लावण्यात आले आहे. सध्या त्यांच्यावर लक्ष ठेवण्यासाठी डॉक्टरांची एक विशेष टीम तैनात करण्यात आली आहे. सध्या ते डॉक्टरांच्या देखरेखीखाली निरीक्षणाखाली आहेत.

शरद पवार यांना रुग्णालयात दाखल केल्यानंतर त्यांच्या कन्या सुप्रिया सुळे यांनी याबद्दलची माहिती दिली आहे. आम्ही बाबांना पुन्हा पुण्यातील रुबी हॉल क्लिनिकमध्ये अॅडमिट केले आहे. त्यांना हायड्रेशनचा त्रास होत होता. त्यासोबतच त्यांच्या काही टेस्ट बाकी आहेत. त्यामुळे त्यांना आम्ही रुग्णालयात दाखल करत आहोत, अशी माहिती सुप्रिया सुळे यांनी दिली आहे. बाबांवर उपचार करणाऱ्या सर्व डॉक्टरांचे खूप खूप आभार, असेही सुप्रिया सुळेंनी त्यांच्या व्हॉटसअॅप स्टेटसद्वारे म्हटले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button