ना. सामंत यांनी रत्नागिरी पालिकेच्या नवीन इमारत बांधकामाची केली पाहणी


रत्नागिरी पालिकेच्या नवीन इमारतीच्या बांधकामाची शुक्रवारी पालकमंत्री उदय सामंत यांनी पाहणी केली. इमारतीच्या कामाला उशिर झाल्यामुळे ठेकेदार कंपनीला त्यांनी चांगलेच सुनावले. १ मे २०२६ ही तारीख निश्‍चित केली आहे. त्या दिवशी या इमारतीचे उदघाटन होणार आहे. त्या तारखेपूर्वी मला इमारतीचे काम पूर्ण हवे आहे. ते कसे करायचे तो तुमचा भाग आहे. कोणाला मदतीला घ्यायचे ते घ्या पण काम पूर्ण हवे असे खडसावले.
पालकमंत्री उदय सामंत गेले दोन दिवस रत्नागिरी दौर्‍यावर आहेत. शहर आणि परिसरातील विकास कामांचा ते आढावा घेत आहेत. काल रात्री पेठकिल्ला येथील शिवसृष्टीची पाहणी केली. शिवसृष्टीचे काम अंतिम टप्प्यात आहे. ते लवकरात लवकर पूर्ण करण्यास ठेकेदार कंपनीला सांगितले आहे. या शिवसृष्टीमुळे पर्यटनाला शहर पर्यटनामध्ये मोठी वाढ झाली आहे. अधिक आकर्षित होण्याच्यादृष्टीने प्रयत्न सुरू आहेत. तसेच विमानतळाच्या धावपट्टीसह टर्मिनल बिल्डींगचे काम देखील प्रगतीपथावर आहे.www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button