मासिक पाळी व्यवस्थापन जनजागृती कार्यक्रम विसपुते हायस्कूल कुवारबाव येथे उत्साहात संपन्न

रत्नागिरी, दि. १८ फेब्रुवारी २०२६
रोटरी क्लब ऑफ रत्नागिरी मिडटाऊन तर्फे मातोश्री कमळाबाई विसपुते (MKV) हायस्कूल, कुवारबाव येथे सकाळी ९ वाजता मासिक पाळी व्यवस्थापन (MHM) विषयावर जनजागृती कार्यक्रम घेण्यात आला. पाचवी ते नववीतील सर्व विद्यार्थिनी, मुख्याध्यापिका विभावरी जोईल मॅडम तसेच शिक्षकवृंद कार्यक्रमाला उपस्थित होते.

कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने झाली. राणे मॅडम यांनी प्रस्तावनेत कार्यक्रमाचा उद्देश स्पष्ट केला. त्यानंतर रोटरी डिस्ट्रिक्ट सेक्रेटरी डॉ. संदीप करेे, फिजिओथेरपिस्ट यांनी रोटरी संस्थेची ओळख व समाजोपयोगी कार्यांची माहिती दिली.

क्लबच्या अध्यक्षा डॉ. स्वप्ना करे (एम.डी. आयु.) यांनी विद्यार्थिनींशी संवाद साधत, प्रात्यक्षिकांच्या माध्यमातून मासिक पाळी व्यवस्थापनाबाबत अत्यंत सोप्या भाषेत मार्गदर्शन केले. स्वच्छता, योग्य सॅनिटरी पॅडचा वापर, गैरसमज दूर करणे आणि आरोग्याची काळजी या मुद्द्यांवर त्यांनी सविस्तर माहिती दिली. विद्यार्थिनींनी मनातील शंका मोकळेपणाने विचारून समाधानकारक उत्तरे मिळवली. शाळेतील महिला शिक्षकांनी मुलींना सक्रिय सहभागासाठी प्रोत्साहित केले. या प्रसंगी सर्व उपस्थित विद्यार्थिनींना मोफत सॅनिटरी पॅडचे वितरण करण्यात आले.

कार्यक्रमाचे संपूर्ण नियोजन क्लबचे सेक्रेटरी राजेंद्र कदम यांनी केले. मुख्याध्यापिका विभावरी जोईल मॅडम यांनी रोटरी क्लब ऑफ रत्नागिरी मिडटाऊन चे आभार मानत, अशा उपक्रमांमुळे मुलींमध्ये आरोग्याबाबत जागरूकता वाढते असे मत व्यक्त केले. पुढील काळातही शाळेत विविध आरोग्य व जनजागृती उपक्रम राबविण्याचा मानस क्लबच्या अध्यक्षा डॉ. स्वप्ना करे यांनी व्यक्त केला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button