
चिपळूण शहरातील नारायण तलाव येथे नमाज पठण करणार्या संशयितांवर गुन्हा
चिपळूण शहरातील नारायण तलाव येथे नमाज पठण करणार्या संशयितांवर अखेर सोमवारी येथील पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. मात्र कारवाई करण्यास विलंब झाल्याने हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी प्रसिद्धीपत्रकातून नाराजी व्यक्त केली आहे.
३० जानेवारी रोजी काही मुस्लिम नागरिकांनी नारायण तलाव येथे नमाज पठण केले. याबाबत हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी नगर परिषदेला निवेदन देऊन संबधितांवर कारवाई करण्याची मागणी केली. त्यानंतर है प्रकरण पोलिसांकडे गेले. त्यामुळे याची चौकशी सुरू होती. मात्र घटनेदरम्यान नारायण तलाव येथील सीसीष्ठिव्ही कॅमेरे बंद होते. त्यामुळे संबंधितांचा शोध घेणे कठीण बनले आहे. मात्र सोमवारी संशयितांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस परिसरातील सीसीटिव्ही कॅमेर्यांचा आधार घेत याचा तपास करीत आहेत. गुन्हा दाखल करण्यास विलंब झाल्याने हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी प्रसिद्धीपत्रकाव्दारे नाराजी व्यक्त केली आहे.
www.konkantoday.com




