दिव्यांगांसाठी सहाय्यक उपकरणे वितरण करण्यासाठी १७ व १८ फेब्रुवारी रोजी तपासणी शिबिराचे आयोजन

रत्नागिरी : भारतीय कृत्रिम अंग निर्माण निगम व महानगर गॅस लिमिटेड, जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने व एमजीएल यांच्या सामाजिक बांधिलकी प्रकल्पातून रत्नागिरी जिल्ह्यामधील दिव्यांगांसाठी मोफत सहाय्यक उपकरणे वितरण करण्यासाठी तपासणी शिबिर १७ व १८ फेब्रुवारी रोजी आयोजित करण्यात आले आहे.

पात्र दिव्यांग प्रवर्ग असे : अस्थिव्यंग, बहुविकलांग, सेरेब्रल पाल्सी, कर्णबधीर, अंध (९० टक्के वरील), कुष्ठरोग निवारीत. बौद्धिक अक्षम दिव्यांगांची या शिबिरात कोणतीही तपासणी होणार नाही.

दिव्यांगांचे पात्रता निकष : युडीआयडी कार्ड ४० टक्के वरील, आधार कार्ड, रेशन कार्ड – वार्षिक उत्पन्न २ लाख ७० हजारच्या खाली नोंद असलेले किंवा संजय गांधी निराधार पेन्शन पत्र किंवा माननीय खासदार किंवा आमदार किंवा सरपंच किंवा नगरसेवक यांचा उत्पन्न दाखला. मागील ३ वर्षांत लाभार्थीने अलिम्कोकडून त्याच प्रकारच्या उपकरणाचा लाभ घेतलेला नसावा, बॅटरी ऑपरेटेड तीन चाकी सायकल व स्मार्टफोनचा लाभ मागील पाच वर्षांत घेतलेला नसावा.

पात्र दिव्यांगांना मिळणारे साहित्य : या शिबिरामध्ये तपासणीनुसार व्हील चेअर, कुबड्या, एलबोक्रचेस, वॉकिंग स्टिक, श्रवण यंत्र, स्मार्टफोन, ब्रेल किट, सी. पी. चेअर, बॅटरी ऑपरेटेड तीन चाकी सायकल, एडीएल किट आदी सहाय्यक उपकरणे.

शिबिराचे वेळापत्रक असे : सामाजिक न्याय भवन, कुवारबाव, डी मार्ट समोर (रत्नागिरी) येथे १७ व १८ फेब्रुवारी रोजी सकाळी १० ते ४ वाजता ४० टक्क्यांवरील प्रमाणित दिव्यांग.

शिबिरात येण्यापूर्वी दिव्यांगांनी नोंदणीसाठी ९८३४४४०२०० जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र रत्नागिरी या कार्यालयाशी सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेत संपर्क करावा. दिव्यांगांनी नोंदणी करूनच यावे असे जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी सुनीता शिरभाते यांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button