गावठी बॉम्ब बनविताना सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यातील मुळदे तळपवाडी येथील शेतकऱ्याचा मृत्यू


गावठी बॉम्ब बनविताना सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यातील मुळदे तळपवाडी येथील संतोष महादेव मासंग (50) या शेतकऱ्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. बांबोळी-गोवा येथे उपचार सुरू असताना शनिवारी त्यांची प्राणज्योत मालवली.संतोष मासंग हे आपल्या घराशेजारील बंद पडलेल्या पोल्ट्री वजा मांडवात गावठी बॉम्ब तयार करत असताना शुक्रवारी सायंकाळी अचानक स्फोट झाला. या स्फोटात ते गंभीर जखमी झाले. घटनेनंतर त्यांना तातडीने कुडाळ येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्राथमिक उपचारांनंतर अधिक उपचारासाठी बांबोळी-गोवा रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र उपचारादरम्यान त्यांच्या प्रकृतीत अधिक बिघाड झाल्याने शनिवारी त्यांचा मृत्यू झाला, अशी माहिती कुडाळ पोलिस स्थानकातून देण्यात आली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button