गोळपमध्ये आज साजरा होणार श्री साईबाबा मंदिराचा १४ वा वर्धापन दिन

रत्नागिरी : तालुक्यातील गोळप, मानेवाडी येथील श्री साईबाबा मंदिराचा १४ वा वर्धापन दिन उद्या (१४ फेब्रुवारी) साजरा होणार आहे. या निमित्ताने उद्या सकाळी श्री सत्यनारायण महापूजा व दुपारी १२ ते ४ या वेळेत महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. त्याचबरोबर सांस्कृतिक कार्यक्रमही होणार असून, रात्री १० वाजता मळदोबा नमन मंडळ, नाखरे यांचे ‘कंसाचे गर्वहरण’ हा पौराणिक नमन कार्यक्रम होणार आहे.
वर्धापनदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमांना सर्व भाविकांना उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजक सागर शशिकांत मोहिते परिवार व मित्र परिवारातर्फे करण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button