
टिडब्लुजेच्या आरोपिला जेवण देणाऱया पोलिसांना कारणे दाखवा. जिल्हा पोलीस अधीक्षकांची माहितीपोलीस भरतीत गैरप्रकार करणाऱयांपासून सावध राहण्याचे केले आवाहन :
रत्नागिरी
टिडब्लुजे घोटाळ्यातील आरोपी संकेश घाग याला हॉटेलमध्ये जेवण दिल्याप्रकरणी चिपळुणातील पोलिसांना कारणे दाखवा नोटीस काढण्यात आली असल्याचे बगाटे यांनी सांगितल़े हजारो कोटी रुपयांची आर्थिक फसवणुक केल्याप्रकरणी संकेश याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होत़ा मागील अनेक महिन्यांपासून फरार असलेल्या संकेश याला चिपळूण पोलिसांकडून अटक करण्यात आली होत़ी यानंतर न्यायालयापुढे हजर करताना पोलिसांनी संकेश याला एका हॉटेलमध्ये जेवण दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आह़े यासंदर्भात पोलिसांचे काय म्हणणे आहे हे आपण मागविले असल्याचे बगाटे यांनी सांगितल़े
जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालय येथे आयोजित पत्रकार परिषदेत बगाटे बोलत होत़े संकेश हा टीडब्लुजे कंपनीत संचालक म्हणून कार्यरत होत़ा पुणे येथून संकेश याला पोलिसांनी अटक केल्याची माहिती समोर येताच एकच खळबळ उडाली होत़ी यानंतर गुंतवणुकदारांनी मोठी गर्दी चिपळूण येथील सत्र न्यायालय परिसरात केली होत़ी 27 जानेवारी रोजी पोलिसांकडून त्याला न्यायालयापुढे आणण्यात आले होत़े यावेळी न्यायालयाने संकेश याला 3 फेब्रुवारी पर्यंत पोलीस कोठडी सुनावली होत़ी दरम्यान पोलिसांनी दिलेल्या जेवणामुळे नागरिकांमध्ये संतोष निर्माण झाला होत़ा दरम्यान या प्रकरणाची गंभीर दखल घेत आपण कारणे दाखवा नोटीस काढली असल्याचे बगाटे यांनी सांगितल़े
पोलीस भरती कालावधीत गैरप्रकारापासून सावधान
रत्नागिरी जिल्हा पोलीस दलातील शिपाई व पोलीस शिपाई चालक पदासाठी भरती प्रक्रिया हाती घेण्यात आली आह़े पोलीस भरती प्रक्रिया कालावधीत भ्रष्टाचारी प्रवृत्तीच्या लोकांकडून तसेच बोगस दलालांकडून किंवा अन्य कोणत्याही व्यक्तींकडून ओळखीचा गैरफायदा घेवून व तसे ओळखीचे अगर अन्य प्रकारचे अमिष दाखवून कोणी पैशाची मागणी करत असल्यास पोलीस अधीक्षक कार्यालय, लाचलुचपत विभाग यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांनी केले आह़े
बगाटे यांनी सांगितले की, पोलीस भरती प्रक्रियेदरम्यान काही लोकांकडून गैरप्रकार करण्याचा प्रयत्न केला जात़ो पैसे देवून नोकरीला लावतो असे अमिष देखील दाखविले जात़े यातुन भरतीसाठी आलेल्या उमदेवारांची फसवणुक होत़े कुणाकडून गैरप्रकार होत असल्यास याबाबत तक्रार दाखल झाल्यास पोलिसांकडून कारवाई करण्यात येईल असे बगाटे यांनी सांगितल़े
पोलिसांसाठी नवीन गाडय़ांची मागणी
रत्नागिरी पोलीस दलातील अनेक गाडय़ा कालबाह्य झाल्या आहेत़ पोलिसांना नवीन गाडय़ा उपलब्ध होण्यासाठी मागणी करण्यात आली आह़े लवकरच गाडय़ा उपलब्ध झाल्यास पोलिसांचे काम अधिक गतीमान होईल असा विश्वास बगाटे यांनी यावेळी व्यक्त केल़ा




