लांजा तालुक्यातील गोळवशी येथे पिकअप शेडमध्ये ४० वर्षीय इसमाचा मृतदेह आढळला


लांजा तालुक्यातील गोळवशी आंबा स्टॉप येथील एसटी पिकअप शेडमध्ये एका ४० वर्षीय व्यक्तीचा मृतदेह आढळून आल्याची घटना बुधवारी सकाळी उघडकीस आली आहे. याबाबतची माहिती विठोबा गोविंद काबदुले (५९, रा. पुर्ये गवळीवाडी, ता. संगमेश्वर) यांनी लांजा पोलिसांना दिली. मृत व्यक्तीचे नाव नितीन चंद्रकांत काबदुले (४०, पूर्ये गवळीवाडी, ता. संगमेश्वर) असे आहे. नितीन याला दारूचे व्यसन असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
काही दिवसांपूर्वी नितीन मुंबईत वास्तव्यास गेला होता. त्यानंतर आपण गावी जात असल्याचे नातेवाईकांना सांगून तो मुंबईहून निघाला होता. मात्र, संगमेश्वर तालुक्यातील आपल्या गावी न जाता तो लांजा तालुक्यातील गोळवशी आंबा स्टॉप येथे आला. ४ फेब्रुवारी रोजी पहाटे सुमारे *६.३० वाजण्याच्या सुमारास एसटी पिकअप शेडमध्ये तो मृतावस्थेत आढळून आला. या प्रकरणी लांजा पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून अधिक तपास पोलीस निरीक्षक नीळकंठ बगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेडकॉन्स्टेबल नासिर नावळेकर करत आहेत.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button