रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या ५४ विद्यार्थ्यांची नासा, इस्रो भेटीसाठी निवड


रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या ’जाणू विज्ञान अनुभवू विज्ञान’ या उपक्रमांतर्गत जिल्ह्यातील शाळांमधील पाचवी ते सातवीच्या सर्व विद्यार्थ्यांची केंद्रस्तरावर चाचणी परीक्षा घेण्यात आली. यामध्ये गुणानुक्रमे निवडक विद्यार्थ्यांची तालुकास्तर व जिल्हा स्तरावर परीक्षा घेण्यात आली. एकूण ५४ विद्यार्थ्यांची नासा व इस्रो भेटीसाठी निवड करण्यात आली.
सलग ४ वर्षे रत्नागिरी मार्फत नासा इस्त्रो भेट चाचणी परीक्षा घेतली जात आहे. चारही वर्षे लांजा नं. ५ शाळेने उज्वल परंपरा कायम राखली आहे. यामध्ये राजकुँवर किल्लेदार व हार्दिक कोपरे तालुक्यात अव्वल आले असून इस्रो भेटीची सुवर्णसंधी त्यांना प्राप्त झाली आहे.
सन २०२२ पासून प्रत्येक वर्षी या शाळेतील विद्यार्थ्यांची नासा इनो या अंतराळ संशोधन करणार्‍या संस्थेच्या भेटीसाठी निवड होत आहे. मुलांना पदवीधर शिक्षिका माणिक कदम तसेच मुख्याध्यापक विश्वनाथ सुर्वे, शिक्षिका स्नेहल तुळसणकर, वैशाली कदम व शाळेतील सर्व शिक्षक वृंद यांची प्रेरणा व सहकार्य लाभले.
नासा इस्रो भेट परीक्षेत लांजा नं. ५ शाळेने सलग चारही वर्षे उज्वल यश प्राप्त केल्याबद्दल गटशिक्षणाधिकारी विनोद सावंग, शिक्षण विस्तार अधिकारी चंद्रकांत पावसकर, समृद्धी खडपे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष प्रियांजली कुरुप, इतर सदस्य तसेच पालक यांनी विशेष अभिनंदन केले.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button