
राजापूर तालुक्यात दुबार मतदानाचा प्रकार खपवून घेतला जाणार नाही : अनिल भोवड
राजापूर तालुक्यात होणार्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत दुबार मतदानाचा एकही प्रकार खपवून घेतला जाणार नाही, असा ठाम इशारा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे तालुका संपर्कप्रमुख अनिल भोवड यांनी दिला आहे.
शनिवार ७ रोजी होणार्या निवडणुका पूर्णतः पारदर्शक, कायदेशीर आणि लोकशाही मूल्यांनुसार पार पडाव्यात, यासाठी शिवसेना सज्ज झाली असून प्रत्येक गाव, प्रत्येक बुथ आणि प्रत्येक मतदार यादीवर काटेकोर नजर ठेवली जाणार आहे. मुंबई महानगरपालिका निवडणुकीदरम्यान ज्या पद्धतीने दुबार मतदारांना उघडकीस आणून मतदानापासून रोखण्यात आले होते, त्याच धर्तीवर आता ग्रामीण भागातही कडक अंमलबजावणी केली जाणार असल्याचे भोवड यांनी सांगितले.
www.konkantoday.com



