चिपळूण तालुक्यातील जलसंपदा कार्यकारी अभियंता निलंबित


संगमेश्वर तालुक्यातील गडनदी व राजापूरमधील जामदा प्रकल्प संदर्भातील देयकाच्या अदायगीप्रकरणी आवश्यक मंजुरी नसताना पत्रव्यवहार केल्याच्या प्रकरणाची चौकशी सुरू असतानाच महाराष्ट्र शासनाने चिपळूण येथील जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता प्रकाश जाधव यांना तत्काळ निलंबित करण्याचा निर्णय घेतला आहे.
पाटबंधारे प्रकल्प बांधकाम विभागाच्या विभागीय कार्यालयाने कंत्राटदारास प्रलंबित देयकाची अदायगी अनुदान उपलब्ध झाल्यानंतर करता येईल, अशा आशयाचे पत्र दिले होते. हे पत्र कोणत्या अधिकारात दिले, याबाबत चौकशी आवश्यक असल्याचे जलसंपदा विभागाने ६ ऑगस्ट २०२६ रोजी काढलेल्या शासन आदेशात नमूद केले आहे. या पत्रामुळे शासनावर आर्थिक भार निर्माण होण्याची शक्यता असून संबंधित कृतीमुळे न्यायालयीन प्रकरण उदभवले असल्याचेही आदेशात नमूद केले आहे. त्यामुळे चौकशी पूर्ण होईपर्यंत प्रकाश जाधव यांना सेवेत ठेवणे योग्य होणार नाही, असे कार्यकारी संचालक, कोकण पाटबंधारे विकास महामंडळ यांनी कळवल्यानंतर शासनाने शिस्तभंगाची कारवाई करत निलंबनाचे आदेश दिल आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button