लोटे परशुराम एमआयडीसीत होतेय बेसुमार माती उत्खनन, प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याचे नागरिकांच्या तक्रारी


लोटे परशुराम औद्योगिक वसाहतीमध्ये बेसुमार माती उत्खनन सुरू असून, शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडत आहे. याबाबत संबंधित यंत्रणांना विचारले असता त्यांच्याकडून माहिती देण्याचे टाळले जाते किंवा चुकीची माहिती देऊन दिशाभूल केली जाते, असा आरोप येथील नागरिक करत आहेत.
खेड तालुक्यातील लोटे औद्योगिक वसाहतीमध्ये तलारी फाटा ते वसाहतीमधील कारखाने असे अंतर्गत रस्त्यांचे काम महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळाच्यावतीने चालू आहे. या कामासाठी लागणारी माती ही नजिकच्या एका टेकडीचे मोठ्या प्रमाणावर उत्खनन करून मिळविण्यात येत आहे. यासंदर्भात एमआयडीसीकडे चौकशी केली असता, हे काम एका कन्स्ट्रक्शन कंपनीला दिले गेले असून ज्या जागेत माती उत्खनन केली जात आहे ती जागा एमआयडीसीच्या मालकीची नाही. परिणामी त्याची रॉयल्टी त्यांनी भरली आहे की नाही हे पाहाणे महसूल खात्याचे काम आहे, असे एमआयडीसीच्या अधिकार्‍यांनी सांगितले.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button