
रत्नागिरी भारतीय तंत्रनिकेतनमध्ये संत रविदास महाराज यांची जयंती साजरी
रत्नागिरी : येथील शासकीय तंत्रनिकेतनमध्ये संत रविदास महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली. या प्रसंगी संस्थेचे प्राचार्य डॉ. चं. य. सिमिकेरी यांनी संत रविदास महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन केले.
शास्त्र विभागाचे अधिव्याख्याता विरेंद्र वायाकोस यांनी संत रविदास महाराज यांच्या जीवनाबद्दल माहिती सांगात त्यांनी दिलेल्या सामाजिक सामनता आणि निर्गुण ईश्वर भक्तीचा संदेश हाच मानव कल्याणाचा मूलमंत्र कसा आहे याचे विश्लेषण केले. या कार्यक्रमाला संस्थेतील विविध विभागाचे विभागप्रमुख, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
प्राचार्यांनी संत रविदास महाराज यांनी सांगितलेल्या माणूस हा जन्मपेक्षाही कर्माने कसा महान होतो या विचाराचे महत्व विषद करत, हा कर्म सिद्धांत जीवनात यशस्वी होण्याचा राजमार्गच आहे असे सांगत सर्वांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता केली.




