मुंबई-गोवा महामार्गावर खेड तालुक्यातील पारस आईस फॅक्टरीसमोर पादचाऱ्याचा अज्ञात वाहनाच्या धडकेत मृत्यू


मुंबई-गोवा महामार्गावर खेड तालुक्यातील पारस आईस फॅक्टरीसमोर पादचाऱ्याचा अज्ञात वाहनाच्या धडकेत मृत्यू होण्याची घटना घडली आहे
पारस आईस फॅक्टरीसमोर शनिवारी पहाटेच्या सुमारास एका भीषण अपघातात ४० वर्षीय पादचाऱ्याचा जागीच मृत्यू झाला. मनिष (राजू) मोहन धाडवे (रा. परशुराम दुर्गेवाडी, ता.चिपळूण) असे या अपघातात मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तीचे नाव आहे.
​, मनिष धाडवे हे ३१ जानेवारी २०२६ रोजी शनिवारी पहाटे ३:५० च्या सुमारास महामार्गावरून पायी चालले होते. यावेळी मागून आलेल्या एका भरधाव अज्ञात अवजड वाहनाने त्यांना जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की, वाहनाचे चाक मनिष यांच्या डोक्यावरून गेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर संबंधित वाहनचालकाने जखमीला कोणतीही वैद्यकीय मदत न देता चिपळूणच्या दिशेने पळ काढला.
​या घटनेची नोंद पोलीस ठाण्यात करण्यात आली असून, संदीप गंगाराम साळवी (वय ५०, रा. पिरलोटे बेलवाडी) यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी अज्ञात वाहनचालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button