
वार्यामुळे मासेमारी मंदावली, हर्णे बंदरात बोटी किनार्यावर
गेले आठ दिवस सुरू असलेल्या वार्यांचा परिणाम मासेमारीवर झालेला दिसत असून हर्णे बंदरात मासळीची आवक घटली आहे. चार बॅरल डिझेल संपवून दोन बॅरलचे ही पैसे सुटत नसल्याने येथील मासेमारी तोट्यात चाललेली असल्याने मच्छिमार चिंतेत पडला आहे.
मागील महिन्यात कोळंबी आणि पापलेट ने साथ दिल्यामुळे तेजीत असलेली हर्णे बंदरातील मासेमारी सध्या मात्र मंदावली आहे. गेले १५ दिवस येथील मासळी आवकेत दिवसेंदिवस घट होत चालली आहे. दोन दिवसांपूर्वीपासून मासळीची आवक पूर्ण घटली असल्यामुळे बर्याच नाखवांनी आपल्या नौका किनार्याला उभ्या केलेल्या दिसत आहेत.
www.konkantoday.com




