युतीकडे असलेल्या प्रचंड बहुमताचा वापर जबाबदारीने व लोक हितासाठीच करावा, पालकमंत्री उदय सामंत यांचा नगरसेवकांना सल्ला


रत्नागिरी नगर परिषदेत शिवसेनाभाजप युतीकडे असलेल्या प्रचंड बहुमताचा वापर जबाबदारीने व लोक हितासाठीच करावा. सत्तेच्या जोरावर चुकीची किंवा अनधिकृत कामे केली जात आहेत, असा कोणताही संदेश जनतेत जाऊ देऊ नये, असा स्पष्ट सल्ला पालकमंत्री तथा शिवसेना नेते उदय सामंत यांनी दिला. उपनगराध्यक्ष समीर तिवरेकर यांच्याशी असभ्य वर्तन व शिवीगाळ केल्याप्रकरणी संबंधित नगर अभियंत्याविरोधात कारवाईचा प्रस्ताव येत्या ३० जानेवारी रोजी होणार्‍या सर्वसाधारण सभेत मांडण्यासही त्यांनी संमती दर्शवली.
उपनगराध्यक्ष समीर तिवरेकर यांच्याशी नगर अभियंत्याने केलेल्या वर्तनाबाबत शिवसेनाभाजप युतीच्या नगरसेवकांनी पालकमंत्री उदय सामंत यांच्याकडे तक्रार करण्याचे ठरवले होते. या पार्श्वभूमीवर रविवारी रात्री एका हॉटेलमध्ये युतीच्या नगरसेवकांची स्वतंत्र बैठक पालकमंत्र्यांनी घेतली. या बैठकीला के वळ नगरसेवक आणि नगरसेविकांनाच उपस्थित राहण्याचा संदेश देण्यात आला होता. या बैठकीत पालकमंत्र्यांनी नगर परिषद आणि नगरसेवकांच्या भूमिकेबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. युतीकडे बहुमत असले तरी त्याचा गैरवापर होणार नाही, याची काळजी घ्यावी. सत्तेच्या बळावर काहीही केले जात असल्याचा आभास निर्माण झाला, तर त्याचा विपरीत परिणाम जनतेत होऊ शकतो, असा इशारा त्यांनी दिला. नगरसेवकांनी पदाच्या मर्यादा व अधिकार जाणूनच काम करावे, असेही त्यांनी सांगितले.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button