
चक्रभेदी सोशल फाऊंडेशनच्या आदर्शातून विधवा व एकल महिलांसाठी हळदीकुंकू सन्मान
चक्रभेदी सोशल फाऊंडेशनच्या आदर्शातून संगमेश्वर तालुक्यातील देवरूख येथील मराठा कॉलनीत विधवा व एकल महिलांसाठी विशेष हळदीकुंकू समारंभाचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमात साडवली येथील पंधरा तसेच देवरूख परिसरातील दहा अशा सुमारे तीस महिलांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.
यावेळी चक्रभेदी सोशल फाऊंडेशनच्या वैदेही सावंत यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, पूर्वीच्या काळातील सती जाणे, केशवपन यांसारख्या अनिष्ठ प्रथा संपल्या आहेत असे वाटत असले तरी त्या आजही विविध स्वरूपात जीवंत आहेत. पतीच्या निधनानंतर महिलांचे कुंकू पुसणे, बांगड्या फोडणे, रंगीबेरंगी साड्या न घालण्याचे बंधन घालणे हे स्त्रीला विद्रूप करण्याचे प्रकार आजही अस्तित्वात असल्याचे त्यांनी नमूद केले. अशा प्रथांना महिलांनीच पुढाकार घेवून विरोध केला पाहिजे, तसेच पुढील पिढीपर्यंत पोहेचणारी ही सामाजिक मानसिकता बदलली पाहिजे, असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी माजी नगरसेविका स्मिता लाड यांनी चक्रभेदी संस्थेच्या कार्याचे कौतुक करत विधवा व एकल महिलांसाठी राबवले जाणारे उपक्रम अत्यंत स्तुत्य असल्याचे सांगितले. समाजाने एकत्र येवून अशा अनिष्ट प्रता समूळ नष्ट केल्या पाहिजेत, असे मत त्यांनी व्यक्त केले.
www.konkantoday.com




