विष प्राशन करणार्‍या वृद्धाचा मृत्यू


रत्नागिरी तालुक्यातील करबुडे येथे उंदीर मारण्याचे विषारी द्रव प्राशन करणार्‍या वृद्धाचा मृत्यू झाला. प्रकाश हिरू आग्रे (६०, रा. करबुडे, रत्नागिरी) असे मृताचे नाव आहे. प्रकाश यांनी १२ डिसेंबर २०२५ रोजी सकाळी ११ वाजता करबुडे येथील आंबा बागेत उंदीर मारण्याचे विषारी द्रव प्राशन केले होते. यावेळी उपचारासाठी त्यांना कोल्हापूर येथील रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान प्रकाश आग्रे यांचा मृत्यू झाला, अशी नोंद रत्नागिरी ग्रामीण पोलिसांत करण्यात आली आहे.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button